Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल मुख्यमंत्रिपद सोडणार?

केजरीवाल मुख्यमंत्रिपद सोडणार?

=पंजाबमधील सत्तेवर डोळा=
Kejriwalनवी दिल्ली, [११ डिसेंबर] – पंजाब विधानसभेसाठी २०१७ मध्ये होणार्‍या निवडणुकीवर डोळा ठेवून, दिल्लीप्रमाणेच पंजाबही काबिज करण्याच्या इराद्याने अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तविली आहे.
अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री असले, तरी त्यांनी कोणतेही खाते स्वत:कडे ठेवले नाही. प्रमुख खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडेच आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये चार जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे आपला पक्ष पंजाबमध्ये अजूनही लोकप्रिय आहे, असा त्यांचा विश्‍वास आहे. याच अनुषंगाने त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याचे कार्य सुरू केले आहे. दरम्यान, पंजाब निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडून, केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्याची त्यांची योजना असल्याचेही सूत्राचे मत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
राजधानी दिल्लीसारखा विजय पंजाबमध्येही शक्य असल्याचे केजरीवाल यापूर्वीच म्हणाले होते. केजरीवाल १४ जानेवारीला पंजाबमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कमी होत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=26139

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1029 of 2452 articles)


=शरद पवार यांचा दावा= नवी दिल्ली, [११ डिसेंबर] - कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा आम्ही नाही, तर ...

×