richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

Subramanian_Swamy1नवी दिल्ली, [२० जून] – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपा नेते महेश गिरी यांच्यावर हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप केला आणि पुन्हा एकदा दिल्लीत वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान, आता या वादात भाजपा खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेत, अरविंद केजरीवाल यांनी महेश गिरी यांची माफी मागणी, अशी मागणी केली आहे.
दिल्लीतील एम. एम. खान यांच्या हत्याकांडात भाजपाचे नेते महेश गिरी यांचा सहभाग असल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच त्यांच्या या आरोपाचा निषेध करण्यासाठी महेश गिरी हे आपल्या कार्यकर्त्यांसह केजरीवाल यांच्या येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध करावेत तसेच याविषयीचे पुरावे सादर करण्यासाठी आपल्याशी चर्चा करावी, या मागणीसाठी गिरी यांनी हे आंदोलन केले आहे.
त्यांच्या आंदोलनास भाजपा खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला असून ते देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच अरविंद केजरीवाल यांचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत गिरी यांची केजरीवाल यांनी माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
केजरीवाल नक्षलवादी विचारधारेचे
अरविंद केजरीवाल हे नक्षलवादी विचारधारेचे असल्याचा आरोपही डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला आहे. असा आरोपकरून स्वामींनी पुन्हा आपच्या नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, केजरीवाल हे नक्षलवादी विचारधारेचे असून, त्यांच्या प्रत्येक कृतीतून हे स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षातील सर्व मंत्रीही चोर असल्याचा घणाघाती आरोप स्वामी यांनी पुढे बोलताना केला आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28672

Posted by on 4:04 pm. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google