Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल संधीसाधू, मोदींशीही मैत्री करतील

केजरीवाल संधीसाधू, मोदींशीही मैत्री करतील

=प्रशांत भूषण यांचा हल्लाबोल=
Prashant-Bhushanवॉशिंग्टन, [२४ मे] – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संजोजक अरविंद केजरीवाल हे संधीसाधू आहेत. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केजरीवाल सातत्याने टीका करीत असतात, त्याच मोदींशी ते स्वत:च्या फायद्यासाठी मैत्रीही करू शकतात, असा हल्लाबोल आपचे निलंबित नेते प्रशांत भूषण यांनी आज मंगळवारी येथे केला.
केजरीवाल हे निर्लज्ज नेत्यांपैकी एक आहेत. अशा नेत्यांना स्वत:च्या फायद्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याला फायदा होऊ शकतो, असे ज्या दिवशी त्यांना वाटेल, त्या दिवशी ते मोदींशी हातमिळवणी करतील. त्यांच्या या स्वभावाविषयी मला अजिबात शंका नाही, असे सध्या अमेरिकेच्या खाजगी भेटीवर असलेले भूषण यांनी येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले.
केजरीवालांचे हे विश्‍वासघाती रूप मी आधीच ओळखू शकलो नाही, याची मला अजूनही खंत वाटते. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी माझा व योगेंद्र यादव यांचा वापर केला. आपच्या कार्यकारिणीवर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले आणि मला व यादव यांना पक्षातून बाहेर काढले. भ्रष्टाचारविरोधात लढा देण्याच्या त्यांच्या केवळ गप्पाच असतात. प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28475

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (271 of 2449 articles)


=दुपारी १ वाजता ऑनलाईन, ३ जूनला मिळणार गुणपत्रिका= मुंबई, [२४ मे] - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ...

×