Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » कॉंग्रेसचे लखनौत जोरदार शक्तिपरीक्षण

कॉंग्रेसचे लखनौत जोरदार शक्तिपरीक्षण

=मंच कोसळल्याने शीला दीक्षित, राज बब्बर किरकोळ जखमी=
raj-babbar-sheila-dixit-ptiलखनौ, [१७ जुलै] – पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने रविवारी राजधानी लखनौ येथे जोरदार शक्तिपरीक्षण केले. मात्र, यावेळी आयोजित रोड शोदरम्यान ट्रकमध्ये तयार करण्यात आलेला मंच तुटल्याने कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राज बब्बर किरकोळ जखमी झाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने या घोषणा केल्यानंतर शीला दीक्षित व राज बब्बर प्रथमच लखनौ येथे पोचले. विमानतळापासून ते कॉंग्रेस मुख्यालयापर्यंत जागोजागी त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले होते. शीला दीक्षित व राज बब्बर विमानतळावरून एका खुल्या वाहनात विराजमान झाले व त्यांचा रोड शो सुरू झाला. मात्र, काही अंतर जाताच ट्रकमध्ये तयार करण्यात आलेल्या छोटेखानी मंचाचा पाय तुटला. शीला दीक्षित, राज बब्बर, प्रमोद तिवारी व संजय सिंह हे चौघेही खाली पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. या घटनेनंतर रोड शो रद्द करण्यात आला.
कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी शीला दीक्षित यांची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. संजय सिंह यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले असून, आरपीएन सिंह उपाध्यक्ष आहेत. या निवडणुकीसाठी पक्षाने संयोजन समिती स्थापन केली असून, प्रमोद तिवारी हे त्याचे प्रमुख असतील. मोहसिना किदवई, सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला, श्रीप्रकाश जयस्वाल, रीता बहुगुणा जोशी, सलीम शेरवानी, प्रदीप जैन, पी. एल. पूनिया, निर्मल खत्री, प्रदीप माथूर यांचा त्यात समावेश आहे. प्रियंका गांधी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी जोरदार प्रचार करणार असल्याचे समजते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29134

Posted by on Jul 18 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (142 of 2452 articles)


श्रीनगर, [१७ जुलै] - बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात उसळलेल्या हिंसाचाराची धग आता बरीच कमी झाली असली, तरी सावधतेचे उपाय ...

×