richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » कॉंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात : व्यंकय्या नायडू

कॉंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात : व्यंकय्या नायडू

venkaiah-naidu-in-lok-sabhaनवी दिल्ली, [९ डिसेंबर] – कॉंग्रेसच्या असंसदीय भूमिकेमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी संसदभवनात आयोजित पत्रपरिषदेत केला. नॅशनल हेरॉल्डच्या मुद्यावरून संसदेत गोंधळ घालण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवताना नायडू म्हणाले की, सभागृहात कामकाज व्हावे, आपण कामकाजात सहभागी व्हावे, अशी बहुतांश सदस्यांची इच्छा आहे, पण कॉंग्रेसचे १५ ते २० सदस्य सभागृहात गोंधळ घालून कामकाज ठप्प पाडत आहे. विशेष म्हणजे हेच लोक आमच्यावर हुकूमशाहीचा आरोप करतात. तुम्ही सभागृहाचे कामकाज चालू देत नाही आणि तुम्हाला काय पाहिजे, ते सांगतही नाही.
तुम्ही फक्त सभागृहाचे कामकाज ठप्प पाडत नाही तर देशातील विकास प्रक्रिया ठप्प पाडत असल्याचा आरोप करत नायडू म्हणाले की, ‘न्याय दो’च्या घोषणा सभागृहात दिल्या जातात, पण न्याय न्यायपालिकेत मिळतो, तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर न्यायपालिकेसमोर जावे लागेल. सभागृहात तुम्हाला एखादा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर नोटीस द्यावी लागते. पण, त्याचेही भान कॉंग्रेसच्या नेत्यांना उरले नाही, असेही ते म्हणाले.
गुलाम नबी आझाद यांनी देशातील लोकशाहीला धोका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तिच्याशी मी सहमत आहे. लोकशाही अन्य कोणामुळे नाही तर कॉंग्रेसमुळेच धोक्यात आली आहे. कॉंग्रेसवाले आपला पराभव अद्याप पचवू शकले नाही. लोकांनी दिलेला जनादेश मान्य करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे ते लोकांशीच बदला घेत आहेत. देशातील विकास प्रक्रिया ठप्प पाडत आहे, असा आरोप नायडू यांनी केला.
आपणच सभागृहात गोंधळ घालायचा आणि सभागृहातील वातावरण सुरळीत नाही, असा कांगावा करायचा हा कॉंग्रेसचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप करत नायडू म्हणाले की, तुमची काही समस्या असेल तर तुम्ही ती सभागृहात मांडा. तुम्हाला न्याय निश्‍चितपणे मिळेल.
जीएसटीला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की, जीएसटी हे घटनादुरुस्ती विधेयक आहे, त्यामुळे ते संसदेच्या संयुक्त अधिवेशनात मांडता येत नाही. कारण विविध राज्यांच्या विधानसभांचीही त्याला मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे जास्तीत जास्त सहमतीने ते पारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी उपस्थित होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26101

Posted by on 3:17 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google