Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेसला नेतृत्वबदलाची गरज

कॉंग्रेसला नेतृत्वबदलाची गरज

=थरूर, ज्योतिरादित्यांचा घरचा अहेर=
Shashi Tharoor1नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरी वगळता इतरत्र सफाया झालेल्या कॉंग्रेसवर त्याच पक्षातील दोन नेत्यांनी टीका केली असून, आत्मचिंतन व नेतृत्वबदलाची मागणी करून पक्षाला घरचा अहेर दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री व केरळातील नेते शशी थरूर यांनी पक्षाला नेतृत्वबदलाचा सल्ला दिला, तर राहुल ब्रिगेडचे सदस्य असलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाने गंभीर आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल निराशाजनक आहेत. ही कॉंग्रेससाठी फेरविचार करण्याची वेळ आहे. केरळात पक्षातील नेते व्यक्तिगत प्रगतीचा विचार करू लागले आणि दुसरीकडे आसामात १५ वर्षे तरुण गोगोई मुख्यमंत्रिपदावर कायम होते, असे तिरुवनंतपुरम्‌चे खासदार असलेले शशी थरूर यांनी निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. पक्षाध्यक्षही फार प्रचार करताना दिसल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत, याची आठवणही थरूर यांनी करून दिली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला घरचा अहेर देताना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. निवडणुकीचे निकाल निराशाजनक आहेत व कॉंग्रेसला आपल्या चुका शोधाव्या लागतील. शिवाय पक्षाला आपल्या धोरणाची चिंता करावी लागेल, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना ते समजेल व ते त्याचे आकलन करतील, असे शिंदे म्हणाले.
पराभवासाठी राहुल जबाबदार नाही; कॉंग्रेसचा दावा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी जबाबदार नाहीत, असा दावा करून कॉंग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्याभोवती सुरक्षाकडे उभे केले.
प्रत्येक निवडणुकीत विशिष्ट मुद्दे असतात. त्यामुळे राज्य विधानसभांच्या निवडणुकांकडे आम्ही ओमन चंडी किंवा तरुण गोगोई या व्यक्ती म्हणून बघत नाही. पराभवाच्या कारणांचे आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात विश्‍लेषण करू, असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक व प्रवक्ते आरपीएन सिंह हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28333

Posted by on May 19 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (319 of 2453 articles)


गुवाहाटी, [१९ मे] - विद्यार्थी चळवळीत काम करण्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे भाजपाचे आसाम विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद ...

×