Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » कॉंग्रेस विधानपरिषदेच्या दोन्ही जागा लढविणार

कॉंग्रेस विधानपरिषदेच्या दोन्ही जागा लढविणार

=राष्ट्रवादीवर कुरघोडी, निर्णय दिल्लीतून होणार=
congress logoमुंबई, [२४ मे] – जूनमध्ये होणार्‍या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एका जागेवर निवडणूक लढवावी व दोन जागांसाठी पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता. परंतु हा प्रस्ताव धुडकावून लावत दोन्ही जागा लढविण्याचा आग्रह कॉग्रेसच्या आमदारांनी धरत राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा मार्ग अवलंबिला आहे. तसेच राज्यसभेसाठी राज्यातलाच उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करावी, अशी सूचनाही आमदारांनी यावेळी केली.
विधानपरिषदेच्या १० व राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० व ११ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी झाली.
बैठकीला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह अनेक आमदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणून त्यांना पदावरून दूर केल्याचा राग अजूनही कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करू नये, अशी भूमिका काही आमदारांनी मांडली.
बैठकीत बहुतांश आमदारांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देताना विरोध दर्शवित कॉंग्रेसने दोन्ही जागा लढवाव्यात, अशी मागणी केली. तसेच एक उमेदवार निवडून आणल्यानंतर १६ मते शिल्लक राहतात. त्यामुळे बाहेरून मते आणू शकणारा दुसरा तगडा उमेदवार उभा करावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
निवडणूक झाल्यास मतांचे योग्य नियोजन करून दोन उमेदवार निवडून आणणे शक्य असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कॉंग्रेस खासदारांच्या खासदार निधीचा पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामासाठी उपयोग होत नसल्याबद्दल आमदारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
अर्जावर घेतल्या सह्या
कॉंग्रेसने विधानपरिषदेच्या दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारी अर्जावर सर्व आमदारांच्या सह्या घेऊन कॉंग्रेसने तयारीही केली आहे. मात्र, या जागा कोणी लढवायच्या याचा निर्णय दिल्लीत कॉंग्रेस हायकमांड घेणार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. हायकमांडने नावे जाहीर केल्यानंतर केवळ या अर्जावर नावे टाकण्याची औपचारिकता पार पाडली जाईल, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28500

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (266 of 2451 articles)


=एक वर्षासाठी राज्यांना दिलासा= नवी दिल्ली, [२४ मे] - वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’च्या ...

×