richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खादी, हस्तकला उत्पादनांच्या विक्रीसाठी शासनाचा पुढाकार

खादी, हस्तकला उत्पादनांच्या विक्रीसाठी शासनाचा पुढाकार

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन=
devendra-fadnavis9नागपूर, [१० डिसेंबर] – खादी व हस्तकलांच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कापड, बांबूपासूनच्या विविध आकर्षक वस्तू, तसेच अन्य हस्तकलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या विक्रीसाठी योग्य दालन उपलब्ध करून देण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने १० ते २० डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या खादी-हस्तकला कौशल्य प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले, सल्लागार आमदार सुधाकर देशमुख, तसेच अन्य आमदार सर्वश्री जयकुमार रावळ, चरण वाघमारे, सरदार तारासिंग, योगेश सागर, नरेंद्र पवार, भाई वीरकर, मल्लिकार्जुन रेड्डी, तसेच संदीप जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, फॉर्च्युन फाऊंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे. कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य फाऊंडेशन करते. विदर्भात खादी आणि हस्तकलेच्या विकासासाठी आणि त्यावर आधारित स्वयंरोजगारासाठी विपुल संधी आहेत. फॉर्च्युन फाऊंडेशन संधी आणि बेरोजगारात सेतू तयार करण्याचे कार्य करत आहे. शासन विविध विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करत असते. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. खादी व हस्तकलांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर वाव असून त्यांच्या विक्रीसाठी मोठे दालन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हस्तकलेत, तसेच खादी उद्योगातील पारंगत सर्व कलाकारांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
या प्रदर्शनात भारतातील नामवंत खादी व ग्रामीण उद्योगांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. खादी ग्रामोद्योग विभागाचा इंद्रायणी हॅण्डलूम स्टॉल, तसेच महिला बचत गटाची उत्पादने, खाद्य पदार्थ, धारणी येथील बाबू संशोधन केंद्राच्या वतीने बांबूच्या उत्कृष्ट कलाकृती, सीताफळे, आदी ५० स्टॉल्स उभारण्यात आले असून, सर्वांनी या प्रदर्शनास भेट देऊन वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26103

Posted by on 3:40 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google