Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » खुशखबर… मान्सूनची अंदमानला धडक

खुशखबर… मान्सूनची अंदमानला धडक

MANSOON-OPEDCLOUDपुणे, [१८ मे] – रखरखत्या उन्हाने शरीराची लाहीलाही झाल्यानंतर प्रत्येकच जण ज्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत होते, त्या नैऋत्य मान्सूनचे आज बुधवारी देशाचे प्रवेशद्वार असलेल्या अंदमान-निकोबार बेटावर धडाक्यात आगमन झाले. पदार्पणातच अंदमानात तो धो-धो बरसला.
मान्सून अंदमानात दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. तामिळनाडू आणि केरळसह दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. अंदमानात मान्सूनचे आगमन होण्याचे हे संकेतच होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे आज मान्सूनचे या बेटावर आगमन झाले, असे वेधशाळेने म्हटले आहे.
भारतीय वेधशाळेने गेल्या रविवारीच येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होईल, असे भाकीत केले होते. तथापि, केरळमध्ये यावर्षी त्याचे आगमन किमान सहा दिवस उशिरा होणार असल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले होते. त्यामुळे अंदमानात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी केरळात आल्यानंतरच त्याचा पुढील प्रवास होत असतो. केरळात साधारणत: १ जूनला येणारा मान्सूनच यावर्षी ६ जूनला येणार असल्याने त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल. परिणामी दुष्काळाचे भीषण चटके सहन करीत असलेल्या विदर्भासह महाराष्ट्रात यावेळी मान्सूनचे आगमन १७ ते १८ जूनपर्यंत होईल, असा अंदाज आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झाल्यामुळे तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.
पदार्पणातच बरसला
अंदमानात आगमन झाल्यानंतर येथील सर्वच बेटांवर तो धो-धो बरसत आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सूनचा जोर फार जास्त आहे. आगामी दोन दिवस अंदमानात मान्सूनचा पाऊस असाच जोरदार बरसणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
आता प्रतीक्षा केरळात
यावर्षी अल् निनो हा घटक सक्रिय नसला, तरी वातावरणातील बदलामुळे मान्सूनच्या केरळकडील प्रवासात अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे १ जून ऐवजी ६ जून रोजी तो केरळात येणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28304

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (326 of 2450 articles)


=समोर आली धक्कादायक माहिती= नवी दिल्ली, [१७ मे] - पंजाबच्या पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळावर गेल्या २ जानेवारी रोजी ...

×