richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, विदर्भ » गिरीश व्यास विधानपरिषदेवर अविरोध

गिरीश व्यास विधानपरिषदेवर अविरोध

=पाचही उमेदवारांची माघार, गडकरी वाडा, बडकस चौकात जल्लोष=
Girish vyas on BJP meetingनागपूर, [१२ डिसेंबर] – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गिरीश व्यास यांची शनिवारी अविरोध निवड झाली. गिरीश व्यास वगळता सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २७ डिसेंबर रोजी होणार होती. या जागेसाठी भाजपातर्फे गिरीश व्यास, महापौर प्रवीण दटके, कॉंग्रेसतर्फे अशोकसिंह चव्हाण व नगरसेवक संजय महाकाळकर, तर अपक्ष म्हणून सुनील पौनीकर व नितीन राय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी दुपारी ३ वाजता व्यास वगळता सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
गिरीश व्यास यांच्या निवडीची माहिती कळताच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर महाल भागातील बडकस चौक, गडकरी वाडा, तसेच धंतोली येथे विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पेढे भरवून आनंद व्यक्त केला. विजयाच्या घोषणेनंतर गिरीश व्यास यांनी महाल येथील गडकरी वाड्यात भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
अल्पपरिचय
गिरीश व्यास बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत तयार झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील ते सक्रिय कार्यकर्ते होते. आणिबाणीच्या काळात सत्याग्रहींचे नेतृत्व करताना ८ कार्यकर्त्यांसह त्यांनी ९२ दिवसांचा कारावास भोगला आहे. प्रभावी वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे व त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यासोबतच कबड्डी, जलतरण, बॅडमिंटन आदी क्रीडा प्रकारात नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.
जनसंघाच्या काळात बुथप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. भाजपाच्या स्थापनेपासून ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. १९८५ साली गिरीश व्यास यांनी महाल संघ कार्यालय वॉर्डातून नगरसेवक म्हणून विजय संपादन केला. १९९१ साली त्यांनी निकालस मंदिर वॉर्डातून विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. नागपूर महानगरपालिकेसाठी तिसर्‍यांदा तिकीट देण्यात आले, त्यावेळी त्यांनी लढण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना शहर भाजपाचे मंत्री, महामंत्री, नगर भाजपाचे सचिव, प्रदेश स्तरावर निमंत्रित सदस्य म्हणून संघटनेत काम केले. १९९५ साली शहराचे महामंत्रिपद त्यांनी भूषविले. त्यानंतर त्यांनी दोन वेळा शहर भाजपाचे अध्यक्षपद सांभाळले. यासोबतच प्रदेश महानगर पालिका संयोजक म्हणून गिरीश व्यास यांनी काम पाहिले. भाजपाच्या आंदोलनांच्या रचनेत नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा होता. शहरातील अनेक शैक्षणिक, क्रीडा, तसेच सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26161

Posted by on 4:39 am. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google