richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » गुजराती लेखक चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार

गुजराती लेखक चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार

Raghuveer Chaudhari- Gujarat Sahitya Academyनवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला. ५१ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी रघुवीर चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
चौधरी यांनी आजवर अनेक कविता, नाटक तसेच इतर साहित्य प्रकारातही भरपूर लेखन केले. १९७७ मध्ये ‘उप्रवास कथात्रयी’साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या साहित्यिक व लेखकांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. याआधी उमा शंकर जोशी, पन्नालाल पटेल आणि राजेंद्र शाह यांना ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला होता. तर, २०१४ मध्ये कोसलाकार भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26310

Posted by on 10:22 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google