Home » ठळक बातम्या, मराठवाडा, रा. स्व. संघ » गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन : सरसंघचालक

गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन : सरसंघचालक

dr.mohanbhagwatहिंगोली, [१६ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी गुणवान व्यक्ती घडविण्याचे कार्य करीत आहेत. समाजास शिक्षित व प्रबुद्ध करणे गरजेचे असून, गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन घडून येते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कयाधु महासंगम कार्यक्रमात बोलताना केले.
येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माउली सेवाभावी संस्थेचे संस्थापक विश्‍वनाथ कोल्हाळ आणि सहप्रांतसंघचालक मधुकर जाधव यांची उपस्थिती होती. सरसंघचालक म्हणाले, समाजाला दिशा देण्याचे काम संंघातर्फे साधले जाते. सर्व समाजाला एकसूत्रात बांधण्यासाठी संघ कटिबद्ध आहे. सर्वांना समान संधी मिळावी हीच संघाची भूमिका आहे. भारताने विविधतेतून साधलेली एकता पाहून बाहेर देशातील लोकांची डोकी नेहमी भडकतात. परंतु, सुमारे २ हजार वर्षांपासूनचा इतिहास चाळला, तर भारतात एकोपाच दिसून येतो. अंतर्गत कलह आणि भांडणे झालीच नाहीत, असे नाही. परंतु, त्यापेक्षाही भारताच्या एकतेचा इतिहास मोठा आहे.
हिंदू धर्म सहिष्णू आहे. सत्य, करुणा, त्याग आणि सेवा हेच हिंदू धर्माचे मूलतत्त्व असून, हिंदू धर्म समाजाला जोडण्याचे कार्य करतो. त्यामुळे जगात हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे. त्यावेळी आपल्यातल्याच काही फितुरांनी हा एकसंध देश परकीयांना चांदीच्या ताटात भेट म्हणून दिला. आता संविधानामुळे देशात राजकीय एकता आली आहे. सामाजिक आणि आर्थिक एकता निर्माण झाल्यास या देशाकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना सरसंघचालक म्हणाले, वेगवेगळे गट म्हणून भांडत न बसता एकोप्यातून आपण आपला देश पुढे नेला नाही, तर संविधानाचे रक्षण होणार नाही, असा इशारा डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी दिला होता. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी देेशाच्या उत्थानाकरिता चालणार्‍या सर्व चळवळींमध्ये भाग घेतला. त्यांनी समाजात एकोपा आणि गुणसंपदा निर्माण करण्याकरिता एक कार्यपद्धत निर्माण केली. त्याचेच नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय, असेही मोहनजी आवर्जुन म्हणले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26543

Posted by on Jan 17 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा, रा. स्व. संघ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा, रा. स्व. संघ (901 of 2456 articles)


=भाजपा किसान मोर्चा पाळणार किसान जागरण सप्ताह= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] - ९ ते १५ मार्चदरम्यान देशभर किसान जागरण सप्ताह ...

×