richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आज लोकार्पण

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आज लोकार्पण

=भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती=
gopinath gadमुंबई, [११ डिसेंबर] – बीड जिल्ह्यातील परळी येथे अठरा एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथ गड’ या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण उद्या शनिवार १२ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंडे यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे.
लोकनेते मुंडे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. गेल्या वर्षी ३ जून रोजी त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात या स्मारकाचे काम सुरू झाले. अवघ्या एक वर्षात भव्य स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. उद्‌घाटन समारंभास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्याचे मंत्री व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर, राजकुमार बडोले, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम व डॉ. दीपक सावंत हे मंत्री कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या मित्रपक्षांचे नेते खा. रामदास आठवले, खा. राजू शेट्टी, आ. महादेव जानकर व आ. विनायक मेटे यांची या कार्यक्रमात उपस्थिती असेल.
श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री सानप या समारंभास उपस्थित राहतील. श्रीमती प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे व यशश्री मुंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गोपीनाथ गड या नावाने हे प्रेरणास्थळ उभारण्यात आले आहे. लोटस टेंपल नावाने मुंडे यांचे समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. कमळाप्रमाणे त्याची प्रतिकृती साकारली असून, ७२ फूट उंच आणि १११ फुट अष्टकोनी घेर असलेले हे कमळाचे फूल पाहणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा २२ फूट उंचीचा पंचधातूचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची दहा फूट आहे. गोपीनाथ गडाचे प्रवेशद्वार भव्य आणि आकर्षक आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26130

Posted by on 11:57 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google