चिदम्बरम् यांच्या काळातच फाईल्स गहाळ
Thursday, June 16th, 2016=ईशरत प्रकरणी समितीचा निष्कर्ष=
नवी दिल्ली, [१५ जून] – लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब बनलेल्या ईशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित फाईल्स सप्टेंबर २००९ मध्येच गहाळ झाल्या होत्या, असा स्पष्ट निष्कर्ष एक सदस्यीय समितीने आज बुधवारी आपला अहवालातून मांडला. विशेष म्हणजे, या काळात कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् हे केंद्रात गृहमंत्री होते.
ईशरत आणि तिच्या अन्य साथीदारांच्या चकमक प्रकरणातील पाच दस्तावेजांपैकी केवळ एकच दस्तावेज गृहमंत्रालयातून गहाळ झाला आहे. याचाच अर्थ हा दस्तावेज नकळत किंवा हेतूपुरस्सर फाईलमधून काढण्यात आला आहे किंवा तो दुसरीकडे कुठेतरी ठेवण्यात आला असावा, असे गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिव बी. के. प्रसाद यांनी केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले.
समितीने आपल्या अहवालात चिदम्बरम् किंवा कॉंगे्रस व संपुआच्या कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नसला, तरी दस्तावेज गहाळ प्रकरणी त्यांनी ज्या काळाचा संदर्भ दिला आहे, त्या काळात चिदम्बरम् हेच देशाचे गृहमंत्री असल्याने या अहवालात अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
आपला निष्कर्ष काढताना समितीने सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या ११ अधिकार्यांची साक्ष नोंदवली. यात माजी गृह सचिव जी. के. पिल्लई यांचाही समावेश आहे. १८ ते २८ सप्टेंबर २००९ या काळात हे दस्तावेज गहाळ झाले असल्याचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28619

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!