richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चीन दौरा आटोपता घेऊन जेटली मायदेशी

चीन दौरा आटोपता घेऊन जेटली मायदेशी

arun jaitley8नवी दिल्ली, [२७ जून] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला पाच दिवसांचा चीनचा दौरा एक दिवसाने कमी करून आज सोमवारी राजधानी दिल्लीत परत आले.
२४ जून रोजी जेटली चीनच्या भेटीवर गेले होते. आज ते चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई यांची भेट घेणार होते. पण, भारतात परत जाण्याचा निर्णय आधीच झाला असल्याने त्यांनी रविवारीच जिवेई यांची भेट घेतली. याशिवाय, सोमवारच्या यादीत असलेले अन्य कार्यक्रमही त्यांनी रविवारीच पूर्ण केले होते, असे सूत्राने सांगितले.
चीन दौरा एक दिवस कमी करण्यामागील अधिकृत कारण अद्याप जाहीर करण्यात आले नसले, तरी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जेटली आणि अथमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर टीकेची झोड उठविल्याने जेटलींनी परतण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28980

Posted by on 8:40 am. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google