Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » छगन भुजबळ, समीरला जामीन मंजूर

छगन भुजबळ, समीरला जामीन मंजूर

=मुक्काम मात्र कारागृहातच=
Chagan-Bhujbal2मुंबई, [२२ जून] – महाराष्ट्र सदन नूतनीकरणासह विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील घोटाळ्यांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना आज बुधवारी महाराष्ट्र सदन व कलिना भूखंड घोटाळ्यात जामीन मंजूर झाला आहे. तथापि, अन्य घोटाळ्यांमुळे त्यांचा मुक्काम तूर्तास तरी कारागृहातच राहाणार आहे.
छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना एसीबीच्या विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळ्यात हा जामीन मिळाला आहे. मात्र अन्य घोटाळे व बेकायदेशीर सावकारी प्रकरणी ईडीकडून अजूनही तपास सुरू आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला नाही.
विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून अमाप संपत्ती जमा केल्याच्या आरोपात अंमलबजावणी संचालनालयाने भुजबळ यांना गेल्या १४ मार्च रोजी अटक केली होती. भुजबळांची अटक राज्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंपासारखीच ठरली होती.
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध घोटाळ्यांतून कमविलेला पैसा बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून बोगस कंपन्यांमध्ये गुंतविल्याचा आरोप आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला तब्बल ८८० कोटी रुपयांचा फटका बसला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28728

Posted by on Jun 23 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (194 of 2452 articles)


=नीती आयोगाची शिफारस= नवी दिल्ली, [२२ जून] - संसदेत सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प केवळ लोकप्रिय घोषणांचे एक माध्यम ठरले आहे. ...

×