richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जगात वेगाने वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या

जगात वेगाने वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या

=प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल=

नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचा अहवाल ताजा असतानाच, प्यू रिसर्च सेंटरने आणखी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. संपूर्ण जगभरात मुस्लिमांच्या लोकसंख्येत अतिशय वेगाने वाढ होत असून, या शतकाच्या अखेरीस मुस्लिम हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला समाज ठरण्याची शक्यता आहे. लोकसंख्येत सध्या आघाडीवर असलेल्या ख्रिश्‍चनांनाही मुस्लिम समाज मागे टाकणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
सध्या जगभरातील एकूण लोकसंख्येत ख्रिश्‍चनांचा वाटा एक तृतियांश इतका आहे. ख्रिश्‍चनांची लोकसंख्या २.२ अब्ज इतकी आहे. पण, मुस्लिमांची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, ती पाहू जाता इतिहासात प्रथमच हे जग मुस्लिमबहुल झालेले असेल, २०५० पर्यंत मुस्लिमांची एकूण जागतिक लोकसंख्या ३० टक्के असेल आणि त्यानंतर २०७० पर्यंत मुस्लिम जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला समाज झालेला असेल, असे प्यू रिसर्च सेंटरने आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.
मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचा अर्थ ख्रिश्‍चनांची लोकसंख्या कमी होत आहे, असा मुळीच नाही. पण, मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ होण्याची गती ख्रिश्‍चनांच्या तुलनेत फार जास्त आहे. अहवालानुसार, २०५० पर्यंत जगात ख्रिश्‍चनांची लोकसंख्या २.२० अब्जवरून २.९० अब्जावर जाईल. तिथेच सध्या १.६० अब्ज असलेली मुस्लिमांची संख्या २.८० अब्जच्या घरात जाईल आणि त्यानंतरच्या काही वर्षांत मुस्लिमांनी ख्रिश्‍चनांना मागे टाकलेले असेल.
दरम्यान, याच अहवालात जगात कोणत्याही धर्माला न मानणार्‍या लोकांची अर्थात नास्तिकांची लोकसंख्या २०५० पर्यंत अतिशय कमी झालेली असेल, असेही नमूद केले आहे. नास्तिकांच्या जन्मदरात झालेली प्रचंड घट यामागील मुख्य कारण असल्याचे यात म्हटले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26315

Posted by on 10:32 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google