Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जपानमध्ये साकारणार नेताजींचे स्मारक

जपानमध्ये साकारणार नेताजींचे स्मारक

netaji subhashchandra boseटोकियो, [१० सप्टेंबर] – नेताजी सुभाषचंद बोस मेमोरिअल इंडो-जपान या संस्थेच्यावतीने जपानमधील निक्को शहरात नेताजींच्या स्मरणार्थ सुसज्ज स्मारक बांधण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. इंडो-जपान संस्था जपानच्या कल्चरल असोसिएशनबरोबर गेली सात वर्षे काम करीत आहे. जपान तसेच भारतातही या संस्थेचे मोठे कार्य आहे.
नेताजींच्या स्मारकासाठी जपानमधील आकाच मौरी मासा या शेतकर्‍याने २ एकर जमीन दान दिली आहे. या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या स्मारकाच्या इमारतीत काही खोल्याही असतील. भारतातून येणारे विद्यार्थी आणि उद्योजकांची काही दिवसांकरिता राहाण्याची सोय येथे करण्यात येईल.
नेताजींचे साहित्यही स्मारकात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, योगासाठी एक स्वतंत्र हॉल बांधण्यात येणार आहे. इंफाळमध्ये स्वातंत्र्ययुद्धाच्यावेळी हत्या झालेल्या ४८ हजार जपानी सैनिकांसह ३ हजार भारतीय सैनिकांचेही स्मारक या जागेत उभारण्यात येणार आहे.
स्मारकाचा भूमिपूजन समारंभ सुभाषबाबूंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २३ जानेवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जपानसह भारतातील राजकीय नेते व उद्योजकांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील सुभाषबाबूंच्या अस्थी लवकर भारतात आणून त्याचे वाराणसी येथील गंगेत विसर्जन करावे, अशी मागणीही संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे.
यावेळी जमीन दान केलेल्या आकाच मासा यांच्या कन्या हिरोमी सायको उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांना सुभाषबाबूंच्या कार्याचा आदर आहे. तसेच मी स्मारकाच्या कामासाठी तीन वेळा भारताला भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29272

Posted by on Sep 11 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (102 of 2458 articles)


७० टक्के भारतीयांची इच्छा ताज्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] - नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी ...

×