Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

=२८ मंत्र्यांसह घेतली शपथ, १५ जुने, १३ नवे चेहरे=
Jayalalitha J.चेन्नई, [२३ मे] – अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी आज सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जयललिता या पदावर सलग दुसर्‍यांदा आणि आजवरच्या इतिहासात सहाव्यांदा आरूढ झाल्या आहेत.
मद्रास विद्यापीठाच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात जयललिता यांच्यासोबत अन्य २८ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल के. रोसय्या यांनी या सर्वांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे, जयललिता यांचे सर्वांत विश्‍वासू ओ. पनीरसेल्वम यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. जयललितांनी आपल्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातील १५ सदस्य कायम ठेवताना, तीन महिलांसह १३ नव्या चेहर्‍यांचा समावेश केला आहे. तत्पूर्वी, व्यासपीठावर राज्यपालांचे आगमन होताच जयललिता यांनी त्यांना मोठे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि आपल्या मंत्र्यांची ओळख करून दिली.
केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, पी. राधाकृष्णन, लोकसभेचे उपसभापती आणि अण्णाद्रमुकचे वरिष्ठ नेते एम. थंबीदुराई, तसेच जयललितांच्या स्नेही शशिकला व्यासपीठावर समोरच्या रांगेत होते. कोषाध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना मागच्या रांगेत जागा देण्यात आल्याने द्रमुकने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, आजवर द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोघेही एकमेकांच्या शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिले आहेत. यावेळी ही परंपरा मोडित काढण्यात आली. अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी ‘अम्मांना दीर्घायुष्य लाभो’ अशा घोषणा दिल्या.
दुसर्‍यांदा तीच तारीख
विशेष म्हणजे, बेहिशेबी संपत्ती प्रकरणातून कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांची गेल्या वर्षी मुक्तता केल्यानंतर त्यांनी २३ मे रोजी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आजही २३ मे असून, एका वर्षात त्या दुसर्‍यांदा या पदावर आरूढ झाल्या आहेत.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
जयललिता यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच ट्विटरवर त्यांचे अभिनंदन केले. आपल्या सरकारला केंद्राकडून आवश्यक ते सर्वच सहकार्य प्राप्त होईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
दारूची ५०० दुकाने बंद
मुख्यमंत्रिपदी आरूढ होताच जयललिता लगेच कामाला लागल्या. निवडणूक जाहिरनाम्यातील मुख्य वचनांची पूर्तता करताना त्यांनी राज्यातील ५०० दारूदुकाने बंद करण्याचे आदेश जारी केले. याशिवाय शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्याची आणि नागरिकांना १०० युनिट्‌सपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली. या आदेशांवर त्यांनी तातडीने स्वाक्षरी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28455

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (281 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२३ मे] - नदीजोड प्रकल्पांबाबतचा अंतिम निर्णय राज्यांनाच घ्यायचा आहे, हा निर्णय राज्यांवर लादला जाणार नाही, असे केंद्रीय ...

×