richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जात, रहिवासी प्रमाणपत्राला ‘आधार’

जात, रहिवासी प्रमाणपत्राला ‘आधार’

=केंद्राचा नवा पुढाकार, सर्व राज्यांना निर्देश=
aadhar-card2नवी दिल्ली, [२१ जून] – शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार्‍या जात आणि रहिवासी प्रमाणपत्राला आता आधार कार्डची जोड मिळणार आहे. हे दोन्ही प्रमाणपत्र आधार कार्डशी संलग्न करण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.
सरकारतर्फे घेण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच पुढाकार आहे. विद्यार्थी जेव्हा इयत्ता पाचवी किंवा आठवीत शिक्षण घेतो, त्याचवेळी त्यांना ६० दिवसांच्या आत अशा प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, असे केंद्रातर्फे राज्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांना जातीचे आणि रहिवासी प्रमाणपत्र मिळण्यात प्रचंड विलंब होत असतो आणि सरकारी अधिकारीही पाल्यांच्या पालकांना अनावश्यक त्रास देत असतात, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सरकारला प्राप्त झाल्यानंतर केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हे प्रमाणपत्र आधार क्रमांकाशी जोडूनच जारी होतील, यासाठी सर्व राज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, असे कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट केले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28688

Posted by on 3:27 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google