Home » ठळक बातम्या, वाणिज्य » जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात

=फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव=
JIO-BSNLनवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देणारी नवी योजना सादर केली आहे. एक रुपयापेक्षाही कमी किमतीत बीएसएनएल एक जीबी डाटा देणार आहे. बीएसएनएल ९ सप्टेंबरपासून ही योजना सुरू करत आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी ही योजना असणार आहे. या योजनेतर्ंगत २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा डाऊनलोड करता येणार आहे. बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. पांडे यांनी सांगितले की, २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा या योजनेचा फायदा सहा महिने मिळणार आहे. दोन एमबीपीएसचा वेग सुरुवातीच्या १ जीबीसाठी मिळणार आहे. त्यानंतर १ एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. एअरटेलनेही आपल्या दरांमध्ये ८० टक्के कपातीची घोषणा केली आहे. एअरटेल आता ५ जीबी डेटा ६६६ रुपयांत देणार असून ३ जीबी डेटा ४५५ रुपयांत देण्यात येणार आहे.
बीएसएनएलने जिओपेक्षा स्वस्त ऑफर देणार असल्याचा दावा केला आहे. तसेच ग्राहकांना जास्तीत जास्त स्वस्त ऑफर देण्याचीही घोषणा केली आहे. बीएसएनएल गावापासून ते शहरापर्यंत सेवा देते. त्यामुळे आम्हीदेखील डेटावॉरमध्ये मागे राहाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बीएसएनएलच्या नवीन डेटा ऑफर
१४९ रुपयांत ३०० एमबी २८ दिवसांसाठी
१४९ रुपयांत ४०० एमबी ३० दिवसांसाठी
४९९ रुपयांत ०४ एमबी २८ दिवसांसाठी
५६१ रुपयांत ०५ एमबी ६० दिवसांसाठी
९९९ रुपयांत १० एमबी २८ दिवसांसाठी
५४९ रुपयांत १० एमबी ३० दिवसांसाठी
१४९९ रुपयांत २० एमबी २८ दिवसांसाठी
१०९९ रुपयांत अनलिमिटेड ३० दिवसांसाठी
अशा आहेत नवीन डेटा ऑफर
१९ रुपयांत १०० एमबी ०१ दिवसासाठी
१७ रुपयांत ११० एमबी ०१ दिवसासाठी
१४९ रुपयांत ३०० एमबी ३० दिवसांसाठी
१०९ रुपयांत ३०० एमबी २८ दिवसांसाठी
१४९ रुपयांत ४०० एमबी ३० दिवसांसाठी
प्रीपेड डेटा ऑफर
४९९ रुपयांत ४ जीबी ३० दिवसांसाठी
१५६ रुपयांत २ जीबी १० दिवसांसाठी
९९९ रुपयांत १० जीबी ३० दिवसांसाठी
५४९ रुपयांत १० जीबी ३० दिवसांसाठी
४९९९ रुपयांत ७५ जीबी ९० दिवसांसाठी
१०९९ रुपयांत अनलिमिटेड ३० दिवसांसाठी

Short URL: https://vrittabharati.in/?p=29253

Posted by on Sep 4 2016. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (105 of 2455 articles)


नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनच्या एकेरी गटात रौप्यपदक जिंकून देशाचा नावलौकिक वाढविणारी भारताची नवी फुलराणी पी. ...

×