Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जी-२० शिखर परिषद आजपासून

जी-२० शिखर परिषद आजपासून

=नरेंद्र मोदी, ओबामा उपस्थित राहणार=
modi-obama1हांगझोऊ, [३ सप्टेंबर] – चीनच्या निसर्गरम्य हांगझोऊ शहरात उद्या रविवारपासून जी-२० राष्ट्रसमूहाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेला प्रारंभ होत असून, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, जागतिक व्यापार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण यासारख्या विषयांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती राहाणार असलेल्या या बैठकीत आर्थिक मंदी आणि व्यापार यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आव्हान म्हणून उभ्या असलेल्या सर्वच मुद्यांवर आम्ही आपली भूमिका ठोसपणे मांडणार आहोत. त्यावर तोडगा काढण्याचा मार्ग शोधताना आंतरराष्ट्रीय आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी आम्ही उपायही सुचविणार आहोत. जगभरातील गरिबांच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी जागतिक अर्थव्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे, यावर आमचा ठाम विश्‍वास असल्याचे मोदी यांनी व्हिएतनामचा दौरा संपवून चीनकडे रवाना होताना सांगितले.
दरम्यान, जी-२० बैठकीपूर्वी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स समूहाची बैठक होणार असून, जी-२० च्या बैठकीत जे मुद्दे प्रभावीपणे उपस्थित करायचे आहेत, त्याबाबतची व्यूहरचना निश्‍चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सीमावादासह राजकीय मतभेद असतानाही भारत आणि चीन सातत्याने द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावर भर देत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29260

Posted by on Sep 4 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (105 of 2458 articles)


=ईडीची कारवाई= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये स्थायिक ...

×