richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जुनी व्यावसायिक वाहने भंगारात काढणार

जुनी व्यावसायिक वाहने भंगारात काढणार

=१५ वर्षे जुन्या बस, ट्रकवर बंदीचा विचार नाही, प्रदूषण रोखण्यासाठी सर्वंकष धोरण: नितीन गडकरी=
gadkari-nitinनवी दिल्ली, [४ डिसेंबर] – दहा वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सरकार लवकरच सर्वंकष धोरण तयार करणार आहे, असे स्पष्ट करताना, १५ वर्षे जुन्या बस आणि ट्रक्सवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्तास तरी नाही, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी दिली.
१० वर्षे जुनी व्यावसायिक वाहने भंगारात काढण्याचे धोरण तयार करण्यात येत आहे. अशा वाहनांना त्यांच्या मूळ किमतीच्या १० ते १५ टक्के किंमत देण्यात येईल. या वाहनांच्या ऐवजी नवे वाहन खरेदी करताना किमान दोन ते अडीच लाख रुपयांचा फायदा व्हावा, यासाठी अशा वाहन मालकांना करसवलत देण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
प्रदूषण हे देशापुढील सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे. पर्यावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे, हाच संदेश पॅरिस येथील जागतिक परिषदेतून देण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुन्या बस आणि ट्रक्सवरही बंदी घालणार काय, असे विचारले असता, या वाहनांवर बंदी घालण्याचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही. तसेही, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय कोणतेही धोरण तयार होऊ शकत नाही. प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार्‍या जुन्या वाहनांबाबत जे काही धोरण तयार होईल, ते सर्वंकष असेल, असे गडकरी यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25990

Posted by on 3:03 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google