richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जूनपासून महिला उडवणार फायटर प्लेन

जूनपासून महिला उडवणार फायटर प्लेन

66th Republic Day paradeनवी दिल्ली, [५ डिसेंबर] – जूनपासून देशात प्रथमच इंडियन एअरफोर्समध्ये महिला फायटिंग विंगमध्ये सहभागी होतील. पुढील वर्षी जूनपासून या महिला पायलट फायटर्स प्लेन उडवणार आहेत. याची घोषणा काल शुक्रवारी संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी लोकसभेत केली.
याआधी भारतीय वायूदल प्रमुखांनी महिला फायटर प्लेन उडवण्यासाठी तयार असल्याची घोषणा केली होती. आता त्यावर सरकारनेही औपचारिक शिक्कामोर्तब केले आहे. यासंबंधी ते म्हणाले की, सराव म्हणून पाच वर्षे महिला पायलट फायटर प्लेन उडवतील. सध्या इंडियन एअरफोर्समध्ये ९४ महिला पायलट आहेत. त्या हेलिकॉप्टर्स आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट उडविण्यात तरबेज आहेत.
इंडियन एअरफोर्सच्या नव्या पायलट्‌सची ६ महिन्यापर्यंत ५५ तासांची फ्लाइंग ट्रेनिंग होते. ही ट्रेनिंग नुकत्याच खरेदी करण्यात आलेल्या स्विस पिलायुस पीसी – ७ टर्बोप्रॉप एअरकॉफ्टवर केली जाते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26015

Posted by on 7:07 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google