Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जेएनयू वादात शिरकावाची इसिसची योजना होती

जेएनयू वादात शिरकावाची इसिसची योजना होती

=एनआयएच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा=
JNU2नवी दिल्ली, [१४ मे] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) याचवर्षीच्या फेबु्रवारी महिन्यात आयोजित कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या वादाचा फायदा घेण्याची कुटील योजना इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने तयार केली होती. देशातील अन्य विद्यापीठांमध्येही अशाच प्रकारे स्थिती चिघळविण्यासाठी इसिसने आपले काही हस्तक पाठविण्याची रणनीती आखली होती.
इसिससाठी भारतात अतिरेक्यांची भरती करणार्‍या जुनूद अल् खलिफा-ए-हिंद या गटाच्या तीन सदस्यांसह इसिसशी संबंधित एकूण २१ जणांना राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने गेल्या महिन्यात अटक केली होती. आशिक अहमद, मोहम्मद अब्दुल अहाद आणि मोहम्मद अशी जुनूदच्या सदस्यांची नावे असून, एनआयएच्या चौकशीत त्यांनी इसिसच्या या घातक योजनेचा खुलासा केला असल्याची माहिती एनआयएच्या अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
जेएनयू प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक करण्यात आल्यानंतर देशभरातच गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन पेटविण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविण्यात आली होती, असे या तिघांनीही चौकशीत सांगितले.
१९ फेबु्रवारी रोजी कन्हैयाला अटक करून तिहार कारागृहात डांबण्यात आले होते. तेव्हा इसिसचेच कार्य करणारी आणखी एक संघटना अन्सार-उत-तौहिदचा म्होरक्या अहमद अलीने पश्‍चिम बंगालच्या हुगळीचा रहिवासी असलेल्या आशिक अहमद उर्फ राजाशी संपर्क साधला आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी होऊन वाहनांची जाळपोळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती. देशात अराजकता निर्माण करण्याची इसिसची खेळी होती, असे अधिकारी म्हणाला.
हा अहमद अली म्हणजेच अमेरिकेच्या सीरिया येथील ड्रोन हल्ल्यात ठार झालेला इसिसचा भारतातील म्होरक्या शरी अरमार असल्याचा एनआयएचा दावा आहे. कर्नाटकच्या भटकळ येथील रहिवासी असलेल्या शफीने भारतातील प्रत्येक राज्यात इसिसचे युनिट स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या होत्या, हे विशेष!
यासिन भटकळला सोडविण्याचीही योजना
इसिसने या अतिरेक्यांवर सध्या तिहार कारागृहात बंदिस्त असलेला इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळला सोडविण्याचीही योजना तयार केली होती. भारतात शिया समुदायाला लक्ष्य बनवून दंगली घडविणे आणि यासिनला कारागृहातून बाहेर आणणे यासाठी काही सदस्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही चौकशीत स्पष्ट झाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28242

Posted by on May 15 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (349 of 2450 articles)


=पाकमध्ये स्थापन केले लष्करी तळ= वॉशिंग्टन, [१४ मे] - भारतीय सीमा भागात चीन आपली संरक्षण क्षमता वाढवत असून, जास्तीत जास्त ...

×