Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे काळाच्या पडद्याआड

sulbha deshpandeमुंबई, [४ जून] – रंगभूमीसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज शनिवारी वृद्धापकाळ निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोगानेही ग्रासले होते.
चित्रपट, नाटक आणि टीव्हीवरील मालिका यासारख्या क्षेत्रात आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या सुलभा देशपांडे यांची ओळख ‘पडद्यावरची आई’ अशीच झाली होती. मुंबईतील आपल्या राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. जुन्या काळचे आणि नवोदित अभिनेते, निर्माते व दिग्दर्शकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. अलीकडील काळात आलेला विहीर, हापूस या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटातच नाही, तर आदमी खिलौना है, गुलाम-ए-मुस्तफा, विरासत यासारख्या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या. अनेक दशक त्यांनी चित्रपट सृष्टीवर राज्य केले होते.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. पण, वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर औषधांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली होती. चित्रपटाच्या पडद्यावरील आई हरपली, अशी प्रतिक्रिया चित्रपट सृष्टीतून व्यक्त होत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28514

Posted by on Jun 4 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (261 of 2452 articles)


=गरिबी हटावचा मार्ग चुकला= बालासोर, [२ जून] - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र ...

×