Home » ठळक बातम्या, मराठवाडा » ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

Sureshraoji Ketkar 1लातूर, [१६ जुलै] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश केतकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे बंधू शिरीष केतकर आणि अन्य परिवार पुण्यात स्थायिक आहे.
मूळ पुण्याचे असलेले केतकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. संघाचे स्वयंसेवक म्हणून सक्रिय असतानाच पुण्याच्या शिवाजी मंदिर सायम् शाखेचे मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. बी. एस. सी. व बी. पी. एड्. पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुढे १९५९ साली ते संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झाले. काही काळ सांगली, सोलापूर येथे काम केल्यानंतर पुढे त्यांनी मुंबई महानगर प्रचारक, महाराष्ट्र प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख, पश्‍चिम क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख, सह-सरकार्यवाह इत्यादी जबाबदार्‍या कौशल्याने पार पाडल्या. चैतन्याचा झरा असलेले केतकर देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे जणू पालकच होते. त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक कामावर त्यांच्या आत्मीयतापूर्ण शैलीचा प्रभाव होता. देशभरातील प्रवासात भेटणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याची तपशीलवार माहिती लक्षात ठेवून पुढच्या वेळी त्यांची प्रेमळ विचारपूस करणारे केतकर हे संघकामाचा चालता-बोलता स्मृतिकोश होते.
गेली काही वर्षे वार्धक्यामुळे, तसेच अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त असूनही, त्यांनी शक्य त्या पद्धतीने संघकाम सुरूच ठेवले होते. आपल्या प्रत्येक प्रवासात निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पत्रांमार्फत देशभरातील कार्यकर्त्यांचे शंकासमाधान करणे अशी कामे ते सातत्याने करीत होते.
क्रीडा भारती, संस्कार भारती, अखिल भारतीय किसान संघ अशा अनेक संस्था-संघटनांना उभे करण्यात केतकर यांचे मोठे योगदान होते.
गेली काही वर्षे पार्किन्सन्सचा विकार बळावल्यामुळे लातूर येथे त्यांचा मुक्काम होता. त्यांना विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी सकाळी त्यांनी तेथेच आपली जीवनयात्रा संपवली. लातूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=29105

Posted by on Jul 17 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (145 of 2454 articles)


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १० नव्या मंत्र्यांचा समावेश फुंडकर, रावळ, शिंदे, देशमुख, निलंगेकर आणि जानकर कॅबिनेट येरावार, चव्हाण, गुलाबराव पाटील, ...

×