Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » झाकिरला वाचवण्यासाठीच लाच घेतली

झाकिरला वाचवण्यासाठीच लाच घेतली

=भाजपाचा जबरदस्त हल्ला=
ravi-shankar-prasad-2नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – झाकिर नाईकची संस्था बेकायदेशीर कारवाया करत असल्याचे २०१२ मध्येच स्पष्ट झाले असतानाही, या संस्थेवर बंदी घालण्यात आली नव्हती. झाकिरच्या देशविरोधी कारवायांवर पांघरुण घालण्यासाठीच राजीव गांधी ट्रस्टला ५० लाख रुपयांची लाच देण्यात आली होती, असा जबरदस्त हल्लाबोल भाजपाने आज चढवला.
२०१२ मध्ये तत्कालीन सूचना व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनीच लोकसभेत सांगितले होते की, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकणार्‍या ज्या २४ बेकायदेशीर विदेशी वाहिन्यांची ओळख पटविण्यात आली आहे, त्यात झाकिर नाईकच्या पीस टीव्हीचाही समावेश आहे. तरी देखील संपुआ सरकारमधील काही लोकांनी झाकिरचा बचाव केला, असा आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषदेत केला.
२०११ मध्ये झाकिरच्या संस्थेकडून कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी सर्वेसर्वा असलेल्या राजीव गांधी ट्रस्टला ५० लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती. त्याच्या दुसर्‍याच वर्षी झाकिरची संस्था देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे संपुआ सरकारनेच जाहीर केले होते. मग, ५० लाखांची देणगी झाकिरला परत का केली नाही, असा सवालही प्रसाद यांनी केला. झाकिरचा बचाव करणारी मंडळी कॉंगे्रस पक्षात उच्चपदावर आहेत, असे स्पष्ट करताना, हा पैसा लाच स्वरूपात घेण्यात आला होता, अशी शंका का उपस्थित केली जाऊ नये, असा सवालही त्यांनी केला.
आम्ही झाकिरची देणगी लगेच परत केली होती, असा कॉंगे्रसचा दावा आहे. पण, झाकिरच्याच संस्थेने कॉंगे्रसकडून आम्हाला एक पैसाही मिळाला नसल्याचे स्पष्ट केले असल्याने कॉंगे्रसचा दावा संशयास्पद आहे, असेही ते म्हणाले. यावेळी प्रसाद यांनी तत्कालीन अल्पसंख्यक व्यवहारमंत्री के. रहमान खान यांनी तिवारी यांना लिहिलेल्या पत्राचाही संदर्भ दिला. झाकिर हा प्रख्यात इस्लामिक विचारवंत असून, प्रादेशिक वाहिन्या आणि हिंदू गटांनी त्याच्याविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेपासून त्याचा बचाव करण्यात यावा, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29277

Posted by on Sep 11 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (98 of 2453 articles)


=जेट खरेदीत लाच दिल्याचा आरोप, डीआरडीओ मागणार स्पष्टीकरण= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - इटलीसोबतच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्याचे भूत अजूनही ...

×