Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » टपाल खात्याची बँक २०१७ पर्यंत सुरू होणार

टपाल खात्याची बँक २०१७ पर्यंत सुरू होणार

=रविशंकर प्रसाद यांची माहिती=
ravi-shankar-prasad-2नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – भारतीय टपाल खात्याची पेमेंट बँक मार्च २०१७ पर्यंत सुरू होणार आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मंगळवारी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात टपाल खात्यासह देशात ११ पेमेंट बँका सुरू करण्यास तत्वत: मंजुरी दिली होती.
पेमेंट बँकेचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा भारतीय टपाल खात्याचा विचार आहे. जागतिक बँक आणि आयसीआयसीआय यासारख्या ४० आंतरराष्ट्रीय संस्थांनी पेमेंट बँकेच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल खात्याला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले. देशभरात टपाल खात्याची १ लाख ५५ हजार १५ कार्यालये आहेत. त्यापैकी १ लाख ३९ हजार १४४ कार्यालये ग्रामीण भागात आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26313

Posted by on Dec 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (973 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] - साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात ...

×