Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » डेंग्यूवर औषध सापडले

डेंग्यूवर औषध सापडले

=एका डोजची किंमत १० हजार=
DENGU MOSQUETOपुणे, [२२ सप्टेंबर] – विविध रोगांवरील लस बनविणारी प्रसिद्ध सीरम या कंपनीने डेंग्यूवर उपचारासाठी डेंग्यूवरील जैविक औषध ‘मोनोक्लोनल अँटीबडी’ तयार केले आहे. हे औषध डेंग्यूच्या चार प्रकारांवर फायदेशीर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या औषधाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘फास्ट ट्रॅक अप्रुव्हल’ मिळविण्यासाठी कंपनी तयारी करीत आहे. सरकारकडून मान्यता मिळताच डेंग्यूच्या रुग्णांना इंजेक्शनच्या रूपात हे औषध देता येईल. औषधाच्या एका डोजची किंमत ५ ते १० हजारांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी एकच डोज पुरेसा राहणार असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
‘सीरमने अमेरिकन कंपनी विस्तेराच्या मदतीने हे औषध तयार केले असून मान्यता मिळताच एक ते दीड वर्षात ते खुल्या बाजारात लॉंच केले जाईल,’ अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. दरम्यान, औषधनिर्मिती क्षेत्रातील सॅनोफी आणि नोवार्टीस या मोठ्या कंपन्याही येत्या ४-५ वर्षांत डेंग्यूवरील औषध बाजारपेठेत आणू शकतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24019

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (1418 of 2466 articles)


=सुषमा स्वराज यांचे अमेरिकन उद्योजकांना आवाहन= नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] - भारतात अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याने अमेरिकी ...

×