Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » तप्त वाळूवर जवान भाजताहेत पोळ्या

तप्त वाळूवर जवान भाजताहेत पोळ्या

=तीन तासांत शिजतो भात=
An Indian soldier stands guard on his side of the Line of Control near Jammu, Kashmir.जैसलमेर, [२१ मे] – संपूर्ण उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट आली असताना राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवरही भयानक परिस्थिती असून, तिथे तैनात असलेले जवान चक्क तप्त वाळूवर पोळ्या व पापड भाजताहेत आणि भातही शिजवत आहेत.
याठिकाणी वाळूवर भांडे ठेवल्यास तीन तासांत भात शिजतो, असा दावा जवानांनी केला आहे. सीमेवरील जवान त्यांच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी वाढत्या तापमानावर लक्ष ठेवत असून, काही ठिकाणी तापमान ५५ अंश सेल्यियस नोंदविले गेल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याच्या मते जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४७.६ अंश सेल्यियस इतके नोंदले गेले.
या क्षेत्रात व्यावसायिक हितसंबंध असणार्‍या फोकस एनर्जी या संस्थेनेही आपल्या थर्मामीटर्समध्ये ५४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचा दावा केला आहे. परंतु, या भागात तापमान नोंदविण्याची सोय हवामान खात्याकडे नसल्याने याला दुजोरा देणे शक्य नसल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28384

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (299 of 2450 articles)


नवी दिल्ली, [२१ मे] - राजकारणात करीअर घडविण्यापेक्षाही कुटुंब घडविण्याचे काम कित्येक पटींनी अधिक कठीण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ ...

×