Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » तरुणांना देणार मुद्रा बँक योजनेचा लाभ

तरुणांना देणार मुद्रा बँक योजनेचा लाभ

=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समिती=
MUDRA-Bankमुंबई, [२४ मे] – मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य तसेच देशांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात मुद्रा बँक योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेनुसार शिशु, किशोर व तरुण या तीन गटांतर्गत उद्योग उभारणीसाठी कुठल्याही प्रकारच्या तारणाशिवाय १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत संबंधित तरुणांना जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.
मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये जिल्हा उद्योग अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक, जिल्हा कौशल्य विकास-रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक यांच्यासह ४ क्षेत्रातील तज्ज्ञ अशासकीय सदस्य, तर १ विशेष नियंत्रित यांचा समावेश असेल. तसेच जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. या योजनेसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात २० कोटी खर्च करण्यात येणार आहे.
मुद्रा योजनेचा तरुणांमध्ये प्रचार, प्रसार करण्यासह जिल्हा स्तरावर कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाप्रमाणे लक्ष्यपूर्तीसाठी संनियत्रण तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे कार्य देखील ही समन्वय समिती करेल. प्रत्येक गावामध्ये उद्योजक निर्माण होण्यासाठी व्यावसायिक मेळावे, कार्यशाळा, प्रशिक्षण चर्चासत्रांचे आयोजन, तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ला तसेच कौशल्य विकासाला चालना देणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन या समितीमार्फत करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28493

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (269 of 2451 articles)


=१४०० किमीचा महामार्ग तयार होणार= नवी दिल्ली, [२४ मे] - भारत, थायलंड आणि म्यानमार या तीन देशांना जोडणारा १४०० किलोमीटर ...

×