richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ताश्कंद चर्चेत शास्त्रीजींसोबत नेताजीच होते?

ताश्कंद चर्चेत शास्त्रीजींसोबत नेताजीच होते?

=प्रथमच मिळाला सचित्र पुरावा=
netaji with lalbahadur shastriकोलकाता, [१२ डिसेंबर] – १९६६ मध्ये ताश्कंद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शांतता चर्चेत तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस हेच होते, हे सिद्ध करणारा सचित्र पुरावा प्रथमच समोर आला आहे.
नेताजी विमान अपघातात ठार झाल्याचे जाहीर करण्यात आल्याच्या दोन दशकांनंतर त्यांचे शास्त्रीजींसोबतचे छायाचित्र बाहेर आले असून, नेताजींवर संशोधन करणार्‍या अभ्यासकांनी ब्रिटिश तज्ज्ञांच्या मदतीने आणि फॉरेन्सिकचा वापर करून ते नेताजीच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, याच सचित्र पुराव्याचा आधार घेत, अभ्यासकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या याच महिन्यातील रशिया भेटीच्या काळात सत्य उघड करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यावर दबाव आणावा, असे आवाहन केले आहे.
शास्त्रीजींसोबतच्या या छायाचित्रात दिसत असलेले नेताजीच आहेत, हे जर सिद्ध झाले, तर १९४५ च्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि १९५० च्या सुरुवातीच्या दशकात जोसेफ स्टॅलिन यांनी त्यांना फासावर लटकविले, या दोन्ही काल्पनिक कथांना विराम मिळणार आहे, हे विशेष!
ब्रिटनमधील उच्च न्यायालय आणि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी बाजू मांडताना नेल मीलर यांनी या छायाचित्राशी संबंधित फॉरेन्सिक अहवाल आणि ब्रिटिश तज्ज्ञांचे मत सादर केले आहे. ताश्कंद येथील भारत-पाक चर्चेच्या काळात शास्त्रीजींसोबत जी व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे, ती व्यक्ती अन्य कुणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोस हेच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक अहवाल आणि तज्ज्ञांचे मत पुरेसे आहे, असा दावा त्यांनी केला.
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ताश्कंद येथील बैठकीच्या काळात आपण नेताजी बोस यांच्यासोबत चर्चा केली होती, असा दावा शास्त्रीजींच्याच एका जवळच्या नातेवाईकाने केला होता. या बैठकीनंतर ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींचे ताश्कंद येथेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. मृत्यूच्या एक तासापूर्वी स्वत: शास्त्रीजींनीही आपले नातू संजयनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून, सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देणारी बातमी मी भारतात परत आल्यानंतर देणार असल्याचे सांगितले होते, या माहितीकडेही मीलर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26151

Posted by on 4:24 am. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google