Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » तूर डाळीचा नियमबाह्य साठा करणार्‍यांवर कठोर कारवाई

तूर डाळीचा नियमबाह्य साठा करणार्‍यांवर कठोर कारवाई

=गिरीश बापट यांची घोषणा=
Girish-Bapatनागपूर, [१० डिसेंबर] – परवानगी न घेता आणि क्षमतेपेक्षा अधिक तूर डाळीचा नियमबाह्य साठा करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
अकोला येथे अवैध धान्य साठा करणार्‍या गोदामांवर टाकण्यात आलेल्या छाप्यासंदर्भातला तारांकित प्रश्‍न अकोला पूर्वचे विधानसभा सदस्य रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्‍नावरील चर्चेदरम्यान, बापट यांनी सदर घोषणा केली.
राज्यात आतापर्यंत ५२६२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून, यातून साडे तेरा हजार क्विंटल तूर डाळ जप्त करण्यात आली आहे. तूर डाळीची साठेबाजी होऊ नये, म्हणून तूर डाळ केवळ १०० रुपये किलोनेच विकायची आणि तूर डाळ राज्याबाहेर पाठवायची नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26119

Posted by on Dec 11 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1036 of 2451 articles)


=कॉंग्रेसचा सभात्याग, जनतेचा पैसा वाया घालवणे अयोग्य : खडसे= नागपूर, [१० डिसेंबर] - हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही ...

×