Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » तेजस श्रेष्ठ; पहिले स्क्वाड्रन दिवाळीपूर्वी : पर्रीकर

तेजस श्रेष्ठ; पहिले स्क्वाड्रन दिवाळीपूर्वी : पर्रीकर

manohar-parrikar1नवी दिल्ली, [२१ मे] – स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेले तेजस हे लढाऊ विमान राफेलइतकेच श्रेष्ठ आणि दर्जेदार आहे. या विमानातून पहिले स्क्वाड्रन दिवाळीपूर्वी उड्डाण घेईल, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शनिवारी दिली.
तेजसची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची आणि दूरवर मारा करण्याची क्षमता राफेलपेक्षा काही प्रमाणात कमी असली, तरी दर्जा मात्र राफेलसारखाच आहे, असे सांगताना पर्रीकर म्हणाले की, देशात कोणत्या प्रकारच्या लढाऊ विमानांची निर्मिती करायला हवी, याबाबतचा निर्णय सरकार वर्षाअखेरीस घेणार आहे.
एका राफेल लढाऊ विमानासाठी जितकी किंमत मोजावी लागते, त्या किमतीत भारतीय हवाई दलाला दोन तेजस विमाने मिळू शकतात. १९९४ पासून हवाई दलात एकही नवे लढाऊ विमान समाविष्ट करण्यात आलेले नाही. आता दोन नवी विमाने आणण्यात आली असून, आगामी दोन ते तीन महिन्यात आणखीही काही विमाने येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
तेजसचे पहिले स्क्वाड्रन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये उड्डाण घेणार आहे. त्याचप्रमाणे दिवाळीपूर्वी मीदेखील या विमानातून भरारी घेणार आहे. तेजस हलके असले, त्याची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता कमी असली, तरी युद्ध क्षेत्रात पराक्रम गाजविण्याची जी गुणवत्ता राफेलमध्ये आहे, तीच तेजसमध्येही आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28394

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (299 of 2453 articles)


=इसिसची भारताला धमकी, ठाण्याच्या तरुणाने जारी केला व्हिडीओ= नवी दिल्ली, [२१ मे] - मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातून सीरियाला गेलेल्या आणि इसिस ...

×