Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » तेल निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवली

तेल निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवली

=चार दशकांनंतर ऐतिहासिक निर्णय=
obama barakन्यूयॉर्क, [१८ डिसेंबर] – देशांतर्गत तेल उद्योगाला सुगीचे दिवस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने आपल्या भूमिकेत ऐतिहासिक बदल करून गेल्या चार दशकांपासून तेलाच्या निर्यातीवर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतला.
ओबामा प्रशासनाच्या या निर्णयाला काही डेमोक्रॅट्‌सनी विरोध केला असला तरी, काही रिपब्लिकन सदस्यांसह प्रमुख तेल कंपन्यांनी साठी जोरदार लॉबिंग केले. ग्राहक, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय योग्यच आहे, असे इंधनसंपन्न नॉर्क डकोटाच्या सिनेटर हेईदी हेईतकॅम्प यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या उद्योगाला जगासाठी खुले केल्यामुळे केवळ सहकारी देशांना ऊर्जा स्थिरता प्रदान होणार असे नसून, रशिया, व्हेनेझुएला आणि मध्यपूर्वेतील अशांत भागांचे या क्षेत्रावरील वर्चस्वही कमी होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. १९७३-१९७४ साली अरब देशांमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर १९७५ साली अमेरिकेने तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26230

Posted by on Dec 20 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1005 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१९ डिसेंबर] - दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...

×