Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » तो दहशतवादी हल्लाच होता

तो दहशतवादी हल्लाच होता

=आता इसिसला संपवणारच: बराक ओबामा=
Barack Obamaवॉशिंग्टन, [७ डिसेंबर] – गेल्या आठवड्‌यातील कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनोतील गोळीबाराची घटना हा दहशतवादी हल्लाच होता, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्य केले आहे. या हल्ल्यानंतर आता इसिस या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपविण्याचा निर्धार केल्याचे ओबामांनी जाहीर केले आहे.
बराक ओबामा यांनी रविवारी रात्री व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफीसमधून नागरिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना बराक ओबामा यांनी ‘इसिस’ ला पूर्णतः नष्ट करण्याचा प्रण केला. ते म्हणाले की, दहशतवाद असा कँसर आहे ज्यावर काहीही उपचार नाही, मात्र हा धोका मोठा आहे. गेल्या वर्षभरापासून मी रोज सकाळी केवळ दहशतवादावर गुप्तचर संस्थांकडून माहिती घेत आहे. दहशवादाच्या समस्येतून आपण नक्की बाहेर पडू, आपण इसिसचा खात्मा करू, असा विश्‍वास बराक ओबामा यांनी व्यक्त केला. आम्ही इसिसच्या विरोधात लढण्यासाठी ६५ देशांच्या सहकार्याने लढत आहोत.
दरम्यान, सॅन बर्नार्डिनो येथे सईद रिझवान फारूख आणि त्याची पत्नी तशफीन मलिक या दहशतवादी जोडप्याने गोळीबार केला होता. यात १४ जणांचा बळी गेला तर २१ जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या लाल मशिदीपर्यंत पोहोचले आहेत. ही मशीद म्हणजे कट्‌टरतावाद्यांचा बालेकिल्ला समजली जाते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26038

Posted by on Dec 8 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1071 of 2458 articles)


=सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा= नवी दिल्ली, [७ डिसेंबर] - मुस्लिम महिलांबाबत होत असलेला पक्षपात संपुष्टात आणण्यासाठी समान नागरी कायदा तयार ...

×