Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी

त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी

=हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा=
s p tyagiनवी दिल्ली, [२ मे] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांची आज सोमवारी सीबीआयने कसून चौकशी केली.
इटलीच्या मिलान येथील विशेष न्यायालयाने अलीकडेच एस. पी. त्यागी यांना हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात लाच मिळाल्याचा ठपका आपल्या निकालात ठेवला होता. यानंतर सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स जारी केला होता. विशेष म्हणजे, भारतातील उच्च न्यायालयाच्या समकक्ष असलेल्या मिलान न्यायालयाने त्यागी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अन्य मध्यस्थांना कशा पद्धतीने लाच देण्यात आली, याबाबतचा तपशीलवार खुलासा केला आहे. यात अनेक ठिकाणी त्यागी यांच्या नावाचा उल्लेख आहे. सीबीआयने याआधीच त्यागी आणि दोन चुलत भावांसह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यागी सोमवारी सकाळी दहा वाजता सीबीआयच्या मुख्यालयात हजर झाले. त्यानंतर चौकशी पथकाने त्यांची अनेक तासपर्यंत कसून चौकशी केली आणि कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांना लाच मिळाली, याबाबतही विचारणा केली. दरम्यान, त्यागी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असल्याचे सूत्राने सांगितले. गेल्या शनिवारी सीबीआयने माजी हवाईदल उपप्रमुखांचीही याच प्रकरणी चौकशी केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28127

Posted by on May 3 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (395 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मे] - सार्वजनिक बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकित असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा ...

×