richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » ‘त्या’ नराधमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

‘त्या’ नराधमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

=निर्भया बलात्कार: महिला आयोगाची याचिका फेटाळली=
rape_victim_braveryनवी दिल्ली, [२१ डिसेंबर] – राजधानी दिल्लीतील अतिशय भीषण निर्भया बलात्कार प्रकरणात तिला सर्वाधिक यातना देऊन मृत्यूच्या दाढेपर्यंत नेणार्‍या अल्पवयीन नराधमाच्या सुटकेविरोधात दिल्ली महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावली. या संदर्भात स्पष्ट कायदा असण्याची गरज न्यायालयाने यावेळी नमूद केली.
अशा प्रकरणांमध्ये काही करायचेच असेल, तर ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागते. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, असे अंशकालीन न्यायमूर्ती ए. के. गोयल आणि न्या. उदय ललित यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने या प्रकरणी निकाल देताना स्पष्ट केले. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने स्वाती मालिवाल यांनी ही याचिका दाखल केली होती.
निर्भयाला सर्वाधिक यातना अल्पवयीन गुन्हेगारानेच दिल्या असल्याने त्याला आणखी दोन वर्षांकरिता बालसुधार गृहातच ठेवण्यात यावे, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली होती. तथापि, न्यायालयाने त्यांची बाजू अमान्य केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला जीवनाची हमी देण्यात आली असून, ती आम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि तसेही शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कुणालाही डांबून ठेवणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्य असून, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन आम्ही निर्णय देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालामुळे अल्पवयीन दोषीच्या सुटकेला आव्हान देणारे सर्वच मार्ग आता बंद झाले आहेत. विशेष म्हणजे, अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला विरोध करीत महिला आयोगाने शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. महिला आयोगाच्या याचिकेवर सुटीकालीन न्यायासनापुढे सुनावणी करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले होते.
महिलांसाठी काळा दिवस : मालिवाल
लोकसभेत पारित होऊनही राज्यसभेत हा कायदा होऊ शकला नाही. देशभरातील महिलांसाठी हा काळा दिवस आहे. आपल्याकडील कायदे कमकुवत आहेत. आंदोलन केल्याशिवाय झोपलेली न्यायव्यवस्था जागणार नाही. सरकार महिलांचे रक्षण करण्यात असमर्थ ठरले आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26266

Posted by on 2:11 pm. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google