Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

=एकनाथ खडसेंवरील आरोप=
EKNATH KHADSE6जळगाव, [२७ जून] – अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या बेछूट व तथ्यहीन आरोपांच्या विरोधात भाजपा अल्पसंख्यक जिल्हा महानगर आघाडीचे अध्यक्ष इरफान मोहम्मद फते मोहम्मद यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. दमानिया यांच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे व पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा व आदरभावाला हानी पोहोचल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे.
अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंवर आरोप केले आहेत. त्यामुळे त्याविरोधात पक्षाचा एक पदाधिकारी खटला दाखल करू शकतात काय, यावर न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयासमोर युक्तिवाद झाला. फिर्यादीतफेर् ऍड. व्ही. एच. पाटील, ऍड. हरूल देवरे, ऍड. आनंद मुजूमदार काम पाहात आहेत. या खटल्यावर पुढील कामकाज ११ जुलै रोजी होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28975

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (169 of 2451 articles)


लंडन, [२७ जून] - आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्थेतर्फे मानद फेलोशिप बहाल करण्यात आली. संपूर्ण ...

×