Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दहशतवादावर गुप्तचर माहितीचे आदानप्रदान

दहशतवादावर गुप्तचर माहितीचे आदानप्रदान

=भारत-चीनचा महत्त्वपूर्ण निर्णय: राजनाथसिंह यांच्या भेटीचे फलित=
RAJNATH SINGHबीजिंग, [२१ नोव्हेंबर] – द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलताना भारत आणि चीनने आज शनिवारी दहशतवादी गट आणि त्यांच्या कारवायांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह शुक्रवारी चीनच्या दौर्‍यावर बीजिंग येथे दाखल झाले. आज शनिवारी त्यांनी चीन सरकारमधील मंत्री आणि सत्तारूढ पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दहशतवादासह विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर दोन्ही देशांतर्फे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. दहशतवादी गट आणि त्यांच्या कारवायांची माहिती एकमेकांना पुरवून आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी लढ्यात सहकार्य करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्परांसोबतच जगालाही सहकार्य करतानाच, या मुद्यांवर वेळोवेळी चर्चा करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला. दरम्यान, अशा प्रकारच्या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत होणार असल्याची माहिती या बैठकीत सहभागी असलेल्या भारतीय शिष्टमंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या बंडखोरांच्या कारवायांवरही राजनाथसिंह यांनी चीनच्या नेत्यांशी चर्चा केली. तथापि, त्यातून नेमके काय निष्पन्न झाले, हे सांगण्यास अधिकार्‍याने नकार दिला. असे असले, तरी दोन्ही देश दहशतवादाच्या मुद्यावर आणखी जवळ आले असल्याने, हा लढा आणखी मजबूत होणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25633

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1187 of 2453 articles)


=सुखबीरसिंग बादल यांचा गंभीर आरोप= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - केंद्रासह अनेक राज्यांमधील सत्तेपासून बाहेर फेकल्या गेलेल्या कॉंगे्रस पक्षाने देशवासीयांवर ...

×