Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादाविरोधात अमेरिका, रशिया एकत्र येणार

दहशतवादाविरोधात अमेरिका, रशिया एकत्र येणार

Putin Obamaवॉशिंग्टन, [१५ नोव्हेंबर] – पॅरिस, बैरूत आणि अन्य काही देशांमध्ये अलीकडील काळात इसिस या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाने केलेले भीषण हल्ले आणि अपहृतांचा शिरच्छेद या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर इसिसविरोधी लढ्यासाखी अमेरिका व रशिया एकत्र येणार असल्याची माहिती आहे.
याच अनुषंगाने व्हिएन्ना येथे सीरियाला पाठिंबा देणार्‍या जागतिक गटाची बैठक संपल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी व रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. इसिसविरोधातील सहकार्य हे अधिक व्यापक होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सीरियात गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेली यादवी संपवून शांतता प्रक्रिया सुरू करण्यासाठी अमेरिका व रशिया हे देश या गटाच्या माध्यमामधून एकत्र काम करीत आहेत. मात्र सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद यांच्या राजवटीसंदर्भात दोन्ही देशांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. रशिया सीरियामध्ये असद यांच्याविरोधातील मवाळ गटांनाही लक्ष्य करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या पार्श्‍वभूमीवर इसिसविरोधातील सहकार्य अधिक व्यापक करण्याचे अमेरिका व रशियाने एकत्रित दिलेले संकेत अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25471

Posted by on Nov 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1241 of 2458 articles)


=व्यंकय्या नायडू यांची माहिती= हैदराबाद, [१५ नोव्हेंबर] - ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांच्या घरात आहे, त्यांना स्वयंपाकाच्या गॅसवरील ...

×