Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी आवश्यक

दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी आवश्यक

  • पंतप्रधान मोदी यांची भूमिका
  • पॅरिस हल्ला चिंताजनक

NARENDRA MODI39नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – फ्रान्सची राजधानी पॅरिसवर झालेला दहशतवादी हल्ला लक्षात घेता, दहशतवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत आहे, यात आता काहीच शंका राहिलेली नाही. दहशतवादी हल्ले रोखायचे असतील, तर सर्वप्रथम त्यांना मिळणारी आर्थिक रसद गोठविणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी हेच आता जगाचे एकमेव उद्दिष्ट असायला हवे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी येथे केले.
मादक द्रव्यांची तस्करी, बँकांवर दरोडा, वाहनांची चोरी, बनावट चलनाचा वापर आणि विकासात प्रचंड मागे असलेल्या देशांकडून दहशतवादाला मिळणारे प्रोत्साहन यासारख्या माध्यमांतून दहशतवादी गट मोठ्या प्रमाणात निधी गोळा करतात. पॅरिसवरील हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता दहशतवाद्यांना त्यांच्या कारवायांसाठी आवश्यक असलेला निधी अगदी सहजपणे मिळत असल्याचेच दिसून येते. आपण जर त्यांची आर्थिक नाकेबंदी केली, तर त्यांची क्षमता आपोआपच कमी होईल, त्यांना शस्त्र आणि स्फोटकांची खरेदी करता येणार नाही आणि त्याचा परिणाम दहशतवादी कारवायांना आळा घालण्यावर होऊ शकेल, असे पंतप्रधानांनी सहावी जागतिक परिषद, तसेच सीबीआय व राज्यस्तरीय भ्रष्टाचारविरोधी ब्युरोच्या २१ व्या परिषदेत बोलताना सांगितले. ३३ देशांमधील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
दहशतवाद ही आता कोणत्याही एका देशाची समस्या नसून, ती जागतिक स्वरूपाची आहे. दहशतवादी कारवायांसाठी काही देशांकडून अमाप पैसा मिळत असल्याने त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटकेही आली आहेत. हा आर्थिक रसद जोपर्यंत गोठविली जाणार नाही, तोपर्यंत वाढत्या दहशतवादाला आळा घालणे शक्य होणार नाही. यासाठी जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सहकार्य अमूल्य ठरणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
संघटित गुन्हेगारीचे जागतिकीकरण झाले असल्याने त्याचा धोका अधिकच वाढला आहे. जगभरातील अर्थव्यवस्थाही यामुळे संकटात सापडली आहे. मोठ्या प्रमाणात काळा पैसा हवाला मार्गे दहशतवादी कारवायांसाठी पाठविला जातो, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
भ्रष्टाचार्‍यांची गय नाही
केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात भ्रष्टाचार कमी झाला आहे. केंद्रातील कोणत्याही विभागात आणि खात्यात भ्रष्टाचार नाही. आपल्या सरकारने आतापर्यंत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार्‍या आणि समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या ४५ अधिकार्‍यांना सेवेतून कमी केले आहे, काहींच्या निवृत्तिवेतनात कपात करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25556

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1215 of 2456 articles)


पोलिसांच्या गोळीबारात दोन दहतशवाद्यांचा खात्मा पाच जणांना अटक, मुख्य सूत्रधाराची नाकेबंदी आत्मघाती महिलेने स्वत:ला उडवले पॅरिस, [१८ नोव्हेंबर] - ...

×