Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » दाऊदच्या मदतीने दंगली घडविण्याचा आयएसआयचा कट

दाऊदच्या मदतीने दंगली घडविण्याचा आयएसआयचा कट

=सिमीचीही मदत घेणार=
pakistani-terrorist-isiनवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] – भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे पाकव्याप्त काश्मिरातून अतिरेक्यांच्या घुसखोरीचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर, पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने आता भारतात दंगली घडविण्यासाठी अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि सिमी या दहशतवादी गटाची मदत घेतली आहे. भारतात भीषण दंगली घडविण्याची योजनाही आयएसआयने तयार केली आहे.
‘मेल टुडे’ या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या हाती आयएसआयच्या कुटील योजनेचे ठोस पुरावेच लागले आहेत. दाऊद पाकच्या भूमीत सुरक्षित असला, तरी भारतात त्याचे नेटवर्क अजूनही सक्रिय आहे. याच नेटवर्कची आणि कायद्याने बंदी असलेल्या सिमीची यासाठी मदत घेण्यात येत आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे इंडियन मुजाहिदीन व सिमीला भारतातून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. या दोन्ही अतिरेकी संघटना निष्क्रिय झाल्यामुळे आयएसआयने दाऊदची मदत घेतली आहे. मार्च १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार असलेल्या दाऊदच्या भारतातील गुंडांच्या माध्यमातून या दंगली घडविण्यात येणार असून, यासाठी काही देशांमधून मोठ्या प्रमाणात निधी पाठविणे सुरू झाले आहे. नामवंत व्यक्ती आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य बनविण्यासाठी ‘डी’ कंपनी व सिमीच्या काही खास लोकांची निवडही करण्यात आली आहे. देशात दंगलींचा भडका उडेल, अशाच लोकांची हत्या करण्याची योजना असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अलीकडेच भाजपाच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी छोटा शकीलचा विश्‍वासातील सहकारी सय्यद रहमानला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतूनच ही धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. त्याच्या मते, श्रीराम सेनेच्या काही बड्या नेत्यांना ठार मारण्याची जबाबदारी आयएसआयने माझ्यावर सोपविली होती. भाजपाचे काही बडे नेते आयएसआय आणि दाऊदच्या निशाण्यावर असून, त्यांच्या हत्येसाठी मोठ्या प्रमाणात पैसा भारतात वळविण्यात येत आहे, असेही वृत्तात स्पष्ट करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25665

Posted by on Nov 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1175 of 2453 articles)


‘अच्छे दिन’ येतील, थोडा वेळ लागेल लालकृष्ण अडवाणी यांचा विश्‍वास अहमदाबाद, [२२ नोव्हेंबर] - देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचा निर्धार ...

×