Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा उद्या लिलाव

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा उद्या लिलाव

=सहभागी होणार्‍या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी=
dawood ibrahimमुंबई, [७ डिसेंबर] – १९९२ मधील येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवल्यानंतर त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
दाऊदच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या लिलावातील पाखमोडिया रोडवरील दिल्ली जायका या हॉटेलचा जाहीर लिलाव बुधवारी होणार आहे. यासाठी ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी लिलावात भाग घेण्याची इच्छा दर्शवल्यानंतर त्यांना शुक्रवारी छोटा शकिलच्या गुंडांकडून जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत आपण पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या लिलावात सहभागी होणार असल्याचे तसेच कोणत्याही प्रकारचे पोलिसांचे संरक्षण घेणार नसल्याचे बालाकृष्णन यांनी सांगितले

Short URL: https://vrittabharati.in/?p=26040

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1064 of 2452 articles)


=आता इसिसला संपवणारच: बराक ओबामा= वॉशिंग्टन, [७ डिसेंबर] - गेल्या आठवड्‌यातील कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनोतील गोळीबाराची घटना हा दहशतवादी हल्लाच होता, ...

×