Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीतील आमदारांना वेतनवाढ

दिल्लीतील आमदारांना वेतनवाढ

delhi vidhansabhaनवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – दिल्लीतील आमदारांची वेतनवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावास शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आमदारांचे वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याच्या या प्रस्तावाला आता नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठवले जाणार आहे.
सत्ताधारी आपच्या आमदारांच्या एका गटाने आपले उत्पन्न कुटुंब आणि कार्यालय दोन्हीही चालविण्यासाठी पुरेसे नसल्याची तक्रार मांडताना, वेतनवाढीची मागणी केली होती. तसेच या आमदारांच्या मासिक वेतनात अडीच पट वाढ करण्याचा प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीने दिला होता. त्यानुरूप आमदारांच्या मूळ १२ हजार रुपयांच्या वेतनात या समितीने तब्बल ४०० टक्के वाढ सुचवली. त्यानुसार प्रत्येक आमदाराला दरमहा ८८ हजार रुपयांऐवजी २.१० लाख रुपये मिळण्याची शिफारस समितीने केली होती. तथापि, शुक्रवारच्या बैठकीनंतर ही वेतन व भत्तेवाढ नेमकी किती झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25805

Posted by on Nov 29 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1127 of 2452 articles)


रावळपिंडी, [२८ नोव्हेंबर] - इसिसच्या हिटलिस्टवर आता पाकिस्तानातील पंजाब प्रांत असून, तिथे घातपात घडवून आणण्याकरिता इसिसच्या छुप्या कारवाया सुरू असल्याचा ...

×