richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी संघ स्वयंसेवक सरसावले

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी संघ स्वयंसेवक सरसावले

rss swayamsevakasमुंबई, [९ डिसेंबर] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सातत्याने दुष्काळाची कारणे आणि त्याचे कायमस्वरुपी निवारणाबाबत उपायांचा विचार करण्यासाठी विशेष बैठक ३ डिसेंबर रोजी आयोजित केली होती.
या बैठकीस उपस्थित असलेल्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागांतील प्रतिनिधींनी आपापल्या परिसरातील पाण्याचे उपलब्ध स्रोत आणि सातत्याने कमी होत जाणारी भूजल पातळी याविषयीचे आपले निरीक्षण नोंदविले.
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भातील पिकांची अतोनात हानी झाली आहे.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून १२ जिल्ह्यांतील १६७ गावांमध्ये लोकसहभागातून दुष्काळ निवारणासाठी विविध पद्धतीने साहाय्य करण्यात येत आहे. यापूर्वी देखील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनकल्याण समितीने समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने हाती घेतलेले ५मोठे जलसंवर्धन प्रकल्प २०१३ साली पूर्ण झाले. ज्यामुळे आज १०० हून अधिक गावांमध्ये विहिरीची पाणीपातळी वाढणे आणि दुष्काळजन्य परिस्थितीत देखील शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा करता येणे शक्य झाले आहे.
या यशामुळे स्वयंसेवकांचा उत्साह व आत्मविश्‍वास देखील वाढला आहे. रा.स्व.संघ (महाराष्ट्र राज्य) जलसंवर्धनासाठी काम करणार्‍या इतर संस्थांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरुज्जीवन करणे, अशा प्रकारे राज्यांतील १२ जिल्ह्यांमध्ये रुपये ७ कोटी खर्चून विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे.
संभाजीनगर (औरंगाबाद) व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाला आहे.
या प्रकल्पांसाठी उद्योग समूहांकडून अर्थसाहाय्य उभे करण्यासाठी विविध स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे. पुढील काळात जाणवणारी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पुढील १८० दिवस विविध ७० छावण्यांमधून पशुखाद्य पुरविले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन, पाण्याच्या बचतीचे व संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतिपर मोहीम राज्यातील विविध ५०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. विविध सभा, प्रदर्शने, वृत्तपत्रांतून प्रसिद्धी, द्वारसभा, चित्रपट, प्रशिक्षण कार्यक्रम या माध्यमातून पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आणि संवर्धनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सुमारे ६ महिने भोजनाची सोय केली जाणार आहे.
सदर बैठकीस संघाच्या पश्‍चिम क्षेत्राचे (गुजरात, महाराष्ट्र व गोवा) प्रचारक डॉ. रवींद्र जोशी, सहक्षेत्र प्रचारक विजय पुराणिक तसेच सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26090

Posted by on 3:06 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google