Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आज मिळणार केंद्राची मदत

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आज मिळणार केंद्राची मदत

=खासदार नाना पटोले यांची माहिती=
Nana-Patoleनवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – कुठे अपुरा पाऊस, तर कुठे अतिवृष्टी यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून उद्या बुधवारी आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे भंडारा-गोंदिया येथील खासदार नाना पटोले यांनी दिली.
राष्ट्रीय आपात् निवारण दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या सोमवारी झालेल्या बैठकीत छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि मणिपूर या चार राज्यांसाठी २०४३ कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. दुष्काळग्रस्त कर्नाटकला याआधीच मदत जाहीर झाली. याच अनुषंगाने महाराष्ट्रावर अन्याय का होत आहे, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा खासदारांनी आज बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. यावेळी जेटली यांनी उद्या बुधवारीच महाराष्ट्राला दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक तो निधी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती भाजपा खासदारांना दिली, असे पटोले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राला दुष्काळाची झळ अतिशय जास्त बसली असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळणारी मदतही जास्त राहणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक गेल्या महिन्याच्या अखेरीस दौर्‍यावर आले होते. या पथकाने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून, त्यानुसार मदतीचा आकडा निश्‍चित करण्यात आला असल्याची माहिती आहे.
केंद्रीय पथक मराठवाडा, अहमदनगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची पाहणी करून गेले होते. यानंतर राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने औरंगाबादचा दौरा करून डिसेंबरअखेर केंद्रीय मदतीची हमी दिली होती. खडसे यांनी लगेच चार हजार कोटींच्या मदतीच्या मागणीसह दिल्ली गाठली होती. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26276

Posted by on Dec 23 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (984 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी रशियाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत. भारत-रशिया वार्षिक परिषदेत ...

×