Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळ: केंद्राकडून प्रस्तावापूर्वीच ९२० कोटींची मदत

दुष्काळ: केंद्राकडून प्रस्तावापूर्वीच ९२० कोटींची मदत

=मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती=
EKNATH KHADSE6मुंबई, [२ डिसेंबर] – अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यात राज्य सरकारने आघाडी घेतली असून, केंद्र सरकारने कधी नव्हे अशी भूमिका घेत तत्काळ मदत म्हणून प्रस्ताव पाठविण्यापूर्वीच ९२० कोटी रुपये दिले असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. केंद्र सरकारकडून अन्य कोणत्याही राज्याला मिळाली नाही एवढी मदत महाराष्ट्राला मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात चार हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. त्या पैकीच हे ९२० कोटी रुपये असून, आणखी किमान तीन हजार कोटी रुपये मिळतील. महाराष्ट्र सरकारने मदतीचा प्रस्ताव पाठवण्यास उशीर केला, अशा आशयाचे कोणतेही विधान केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी लोकसभेत केलेले नाही. मी स्वतः त्या भाषणावेळी संसदेत मध्यवर्ती सभागृहात बसून भाषण ऐकत होतो. अशोक चव्हाणांनी त्या बाबत केलेली टीका अनाठायी होती, असेही खडसे म्हणाले.
केंद्र सरकारने राज्य सरकारला असे स्पष्ट आश्‍वासन दिले आहे की, दुष्काळी स्थितीत जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि मजुरांना काम देण्यासाठी राज्य सरकारने लागेल तितका पैसा खर्च करावा तेवढ्या रकमेची प्रतिपूर्ती केंद्र सरकार करेल. ही फार मोठी गोष्ट असून, यामुळे दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारला मोठे बळ मिळणार आहे, असेही खडसे म्हणाले.
आमच्या मागणीनुसार केंद्र सरकारने आता पीक मदतीमध्ये उडीद, सोयाबीन, सूर्यफूल आणि मूग या पिकांचाही समावेश केला आहे. पूर्वी या पिकांसाठी केंद्राकडून मदत मिळतच नव्हती. या मदतीचे निकषही शिथिल कऱण्यात आले आहेत. अल्पभूधारकांना दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती, तर अधिक जमिनी असणार्‍या शेतकर्‍यांना एक हेक्टरचीच मदत दिली जात होती. आता सरसकट सर्व शेतकर्‍यांना दोन हेक्टरसाठी मदत दिली जाईल, हा एक मोठा बदल आहे. पिकाच्या नुकसानीचे निकषही आता शेतकर्‍यांच्या फायद्याचे झाले असून आता ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यावर मदत मिळणार आहे. पूर्वी हा निकष ५० टक्के नुकसानीचा होता, असेही खडसे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांना मदत देण्यात येत नसल्याची तक्रार केली. त्या संदर्भात खडसे म्हणाले की, त्यांनी आधी जर मला विचारले असते तर, ते असे बोललेच नसते. कारण ज्यांना मदत देय आहे, ती थेट सर्वांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. राज्यातील सर्व एक कोटी ३७ लाख खातेदारांची बँक खाती काढण्यात आली आहे. गेल्या जानेवारी, फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आता शेतकर्‍यांच्या खात्यात थेट मदतीचे पैसे जातात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25995

Posted by on Dec 5 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1080 of 2451 articles)


=ऍक्सिस बँकेचा पुढाकार= मुंबई, [३ डिसेंबर] - ऍक्सिस या देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या खाजगी बँकेने एनआरआय खातेधारक प्रवासी भारतीय ग्राहकांसाठी डिस्प्ले ...

×