Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » दुसरी कारकीर्द घेणार नाही : राजन

दुसरी कारकीर्द घेणार नाही : राजन

Raghuram-Rajan1मुंबई, [१८ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून आपण दुसरी कारकीर्द घेणार नाही, अशी आश्‍चर्यकारक घोषणा रघुराम राजन यांनी आज शनिवरी केली. यामुळे त्यांना या पदावर कायम ठेवण्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.
या मुद्यावर मी सरकारशी सविस्तर चर्चा केली आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो की, आरबीआयच्या गव्हर्नरपदाची कारकीर्द संपल्यानंतर मी आपल्या अकादमीत परत जाणार आहे, असे राजन यांनी आरबीआयमधील आपल्या सहकार्‍यांशी बोलताना स्पष्ट केले. राजन यांची कारकीर्द येत्या ४ सप्टेंबर रोजी संपणार आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रख्यात अर्थतज्ज्ञ असलेले आणि २००८ मधील जागतिक आर्थिक मंदीबाबतचे भाकीत वर्तविणारे राजन यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यानंतर त्यांना दुसरी कारकीर्द मिळणार की नाही, ही चर्चा सुरू झाली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28642

Posted by on Jun 19 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (220 of 2453 articles)


=अमेरिकेने पाकला सुनावले= वॉशिंग्टन, [१८ जून] - पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी सातत्याने नंदनवन ठरत असल्याने आणि दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात पाक असमर्थ ...

×